
मृत्युदंड झालेल्यांना जल्लादानेच फासावर लटकावे, असा काही नियम नाही. पोलिस अधिकारी, कर्मचारीही गुन्हेगाराला फाशी देऊ शकतात.
औरंगाबाद - निर्भयाप्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला मृत्यूदंड ठोठावला जाणार आहे. त्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. मात्र, देशामध्ये सध्या मोजकेच जल्लाद आहेत. त्यांच्याशी तिहार कारागृह प्रशासनाने संपर्क केल्याच्या बातम्याही सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यात. पण, मृत्युदंड झालेल्यांना जल्लादानेच फासावर लटकावे, असा काही नियम नाही. पोलिस अधिकारी, कर्मचारीही गुन्हेगाराला फाशी देऊ शकतात. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार याकूब मेमन या दोघांना पुण्याच्या एका पोलिस शिपायाने फाशी दिली होती. त्याचा अनुभव पाहता त्याला तिहार कारागृह प्रशासन बोलावणे पाठवू शकते किंवा तिहार कारागृहातीलच एखाद्या पोलिस कर्मचाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांनी eSakal.com ला सांगितले.
कोण आहे तो पोलिस शिपाई?
याकूब मेमनला 30 जुलै 2015 ला नागपूर येथे फासावर लटकवण्यात आले. त्यावेळी पुण्याच्या येरवडा कारागृहातून 20 अनुभवी कर्मचाऱ्याचे पथक आठवडाभरापूर्वी नागपूर कारागृहात दाखल झाले होते. त्या पथकात या पोलिस शिपायाचा समावेश होता. या शिपायाचे नाव कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही गुप्त राखले आहे.
मुंबईवरील हल्ल्यातील गुन्हेगार असलेल्या कसाबला 21 नोव्हेंबर 2012 ला फासावर चढविण्यात आले होते. त्यावेळी त्याला फासावर लटकविणा-या चमूचे नेतृत्व येरवडा कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक योगेश देसाई यांनी केले होते. याकूबचे प्रकरणही त्यांनीच हाताळले.
याकूबला फाशी देणाऱ्या शिपायाने येरवडा येथील आणखी एका शिपायाला नागपूर कारागृहात प्रशिक्षणही दिले होते. अफलज गुरू यालाही जल्लादाने फाशी दिली नव्हती. तिहार कारागृहातील शिपायानेच त्याला फासावर लटकवले होते.
पवन जल्लादचेही नाव चर्चेच
उत्तरप्रदेशातील मेरठ कारागृहामध्ये कार्यरत असलेल्या पवन जल्लाद यांनाही तिहार प्रशासन फाशी देण्यासाठी बोलावणे पाठवू शकते. पवन जल्लाद यांचे आजोबा आणि वडीलही जल्लाद होते. पवन यांना मेरठ कारागृहाकडून दरमहा तीन हजार रुपये मानधन दिले जाते.
क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी
देशाच्या इतिहासात बलात्काऱ्याला दुसऱ्यांदा फाशी
निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना जर फाशी झाली तर स्वातंत्र भारताच्या इतिहासात दुसऱ्यांदा बलात्काऱ्याला हा मृत्युदंड दंड ठरणार आहे. यापूर्वी धनंजय चटर्जी याला बलात्कार आणि खुनाच्या आरोपात 14 ऑगस्ट 2004 ला फासावर लटकवले गेले.
मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...
दहा वर्षांत 1,300 जणांना ठोठावला मृत्युदंड
देशात मागील 10 वर्षांत तब्बल 1,300 जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण, त्यापैकी केवळ याकूब मेमन, अफजल गुरू आणि कसाबला फासावर लटकवण्यात आले. मृत्यूदंडाच्या वेळी कारागृह अधीक्षक, एक्झिक्युटिव्ह, मॅजिस्ट्रेट, डॉक्टर आणि जल्लाद उपस्थित असतात. यातील कुणी एक जर नसेल तर फाशी दिली जात नाही.
हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...
अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे
जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!