सात दिवसांपासून हरभरा खरेदी बंद

उमेश वाघमारे
मंगळवार, 22 मे 2018

जालना - मागील सात दिवसांपासून वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी करण्याची मुदत अवघे सात दिवसांची राहिली आहे.

जालना - मागील सात दिवसांपासून वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी करण्याची मुदत अवघे सात दिवसांची राहिली आहे.

वखार महामंडळाचे गोदाम धन्याने पूर्ण भरलेले आहेत आहेत. मात्र तरी देखील नाफेडने हरभरा खरेदी केल्यानंतर साठवणुकीसाठी पर्यायी सोय उपलब्ध केली नाही. त्यामुळे ता.15 मेपासून जालना येथील हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. मात्र हे खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात नाफेडकडून काहीच हालचाली दिसत नाही. त्यात ता.29 मेपसुन हरभरा खरेदी केंद्र बंद होणार आहे. त्यामुळे हरभरा खरेदीसाठी केवळ सात दिवसांची मुदत बाकी आहे. मात्र साठवणुकीची अडचण हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होणार की नाही याचे उत्तर कोणी देण्यास तयार नाही.

Web Title: purchase of gram stopped from seven days

टॅग्स