घाटीत महिनाभराच्या औषधींची स्थानिक खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेल्या नोव्हेंबरपासून औषधींचा तुटवडा सुरू आहे. नव्या नियमांनुसार हाफकिन एकत्र खरेदी करून औषधींचा पुरवठा करणार असल्याने स्थानिक खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे घाटीत निर्माण औषधकोंडी निर्माण झाली होती. "सकाळ'ने या विषयाला वाचा फोडली. परिणामी घाटी प्रशासनाने महिनाभर पुरेल एवढ्या औषधींच्या खरेदीसाठी कोटेशन मागवायला सुरवात केली असून यासाठी वीस लाखांचा आपत्कालीन निधी सोमवारी (ता. 14) वर्ग करण्यात आला. 

घाटीत दररोज दीड हजाराहून अधिक रुग्ण ओपीडी, तर तितकेच रुग्ण आयपीडीत असतात. सध्या "औषधी खासगी आणि उपचार सरकारी' अशी अवस्था आहे. त्यामुळे घाटीतील डॉक्‍टर, नर्सिंग स्टाफला रुग्ण व नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. सामान्य आजाराच्याही गोळ्या-औषधी घाटीत उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना घाटीत उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. शिवाय अजून किमान महिनाभर हाफकिनकडून औषधींचा पुरवठा होण्याची शक्‍यता नसल्याने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सोमवारी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याने अत्यावश्‍यक बाब म्हणून वीस लाखांच्या औषधींच्या स्थानिक खरेदीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. 

मधुमेह, रक्तदाब, त्वचारोगाच्या औषधींसह अत्याश्‍यक सर्जिकल साहित्य, सर्वप्रकारची वेदनाशामक, आयव्ही फ्ल्युडच्या स्थानिक खरेदीसाठी कोटेशन मागविले आहे. आठवडाभरात औषधी मिळतील. काटकसरीने वापर केल्यास महिनाभर पुरेल. काही पुरवठाधारकांना सध्याची परिस्थिती सांगितल्याने औषधींचा पुरवठा करायला होकार दिला आहे. त्यामुळे सध्याच्या टंचाईच्या परिस्थिती आठवडाभरात सुधारेल. 
- डॉ. के. सी. चंडालिया, औषधी भांडारप्रमुख, घाटी. 

Web Title: Purchase of medicines in ghati hospital