जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरु ; आतापर्यंत 18 टक्‍के रब्बीचा पेरा

Rabbi sowing started in the  district ; So far 18% complete
Rabbi sowing started in the district ; So far 18% complete

औरंगाबाद: परतीच्या पावसामुळे हाती आलेले खरिपाचे पीक वाया गेले आहे. यामुळे किमान रब्बीच्या हंगामातून तरी हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्याअनुषंगाने रब्बीसाठी बी-बियाणे खरेदी केले जात आहेत. जिल्ह्यात केवळ 8.14 टक्‍के रब्बीचा पेरा झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसाठी चाऱ्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे चाऱ्यासाठी शेतकरी मका आणि ज्वारी पीक घेणार आहेत. त्याच अनुषंगाने बियाणे खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख आठ हजार 188 हेक्‍टर आहे. त्या तुलनेत 16 हजार 955 हेक्‍टरवर अर्थात केवळ 8.14 टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली. यंदा रब्बीसाठी आतापर्यंत 25 टक्‍के बियाणे विक्री झाले आहे. रब्बीमध्ये गहू, हरभरा, ज्वारीचा पेरा प्रामुख्याने शेतकरी करीत असतो. 

चाऱ्यासाठी मका आणि ज्वारीकडे शेतकऱ्यांचा ओढा 

परतीच्या पावसामूळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहेत. जनवारांसाठी आलेला चाराही खराब झाला आहे. मका चारा पुर्णपणे सडून गेला आहे. यामूळे चाऱ्यांचा गंभीर प्रश्‍न जिल्ह्या निर्माण झाला आहे. सध्या मिळले ते जनावारांना खाऊ घालण्यात येत आहे. रब्बीसाठी पिक आणि चारा उपलब्ध होईल. याच हिशोबाने पिक घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांतर्फे केला जात आहे. प्रमुख्याने शेतकऱ्यांतर्फे मका आणि ज्वारी पेरण्यात येत आहे. या दोन्ही पिकांतून मोठ्या प्रमाणावर चारा निर्माण होतो म्हणून शेतकऱ्यांतर्फे मका आणि ज्वारीचे बियाण्याची मोठी मागणी करीत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. 

तीन तालुक्‍यांत कांदालागवड 
जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्‍यांत कांदालागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यासाठी या तालुक्‍यांतून कांद्याच्या बियाणाची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. खरिपामुळे काहींनी कांद्याचे रोप टाकले होते. ते पावसामुळे खराब झाले. यामुळे काहीजण आता नव्याने कांद्याचे रोप घेत आहेत.

"रब्बीसाठी खरेदी प्रक्रिया उशिराने सुरू झाली आहे; मात्र आतापर्यंत 25 टक्‍केच बियाणे विक्री झाले आहे. यात चारा उपलब्ध होईल अशा पद्धतीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे मका, ज्वारी हे चारा उपलब्ध करून देणारी पिके शेतकरी घेत आहेत. मात्र, अनेक शेतकरी बॅंकांच्या भरवशावर आहेत.'' 
-जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com