औरंगाबाद- 'कमीशन ऑफ इन्क्वायरी अॅक्‍ट'नुसार दंगलीची चौकशी व्हावी - राधाकृष्ण विखे पाटील

मधुकर कांबळे
रविवार, 13 मे 2018

औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्रीपासुन सुरु झालेल्या हिसंक घटनांच्या पार्श्‍वभुमीवर त्यांनी दंगलग्रस्त भागाची आज पाहणी केली. यानंतर त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ही घटना पुर्वनियोजीत असल्याचे पिडीतांशी चर्चा केल्यानंतर समोर आले.

औरंगाबाद - शहरात घडलेल्या दंगलीचे सत्य बाहेर आणण्यासाठी 'कमीशन ऑफ इन्क्वायरी अॅक्‍ट' नुसार चौकशी झाली पाहीजे. तरच दंगलीचे सत्य बाहेर येईल अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना केली. 

औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्रीपासुन सुरु झालेल्या हिसंक घटनांच्या पार्श्‍वभुमीवर त्यांनी दंगलग्रस्त भागाची आज पाहणी केली. यानंतर त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ही घटना पुर्वनियोजीत असल्याचे पिडीतांशी चर्चा केल्यानंतर समोर आले. पोलीसांचा गुप्तचर विभाग कसा काय अनभिज्ञ होता? पोलीसांची गुप्तचर शाखा काय फक्त हप्ता गोळा करण्याचे काम करते का? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला. 

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा 
सामाजीक अशांतता निर्माण करुन राजकीय हित साधण्याच सरकारचा प्रयत्न आहे का? असे भिमा कोरेगाव व औरंगाबाद येथील घटनांतुन प्रश्‍न निर्माण होत आहे. येथील खासदार प्रक्षोभक वक्तव्य करतात यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. प्रसार माध्यमातुन त्यांची वक्तव्ये प्रसिद्ध झाली आहेत. तर घटनेला कारणीभुत मुख्य आरोपी तो कुणाचा वरदहस्त आहे हे सर्वज्ञात आहे. या घटनेत गृहखाते सपशेल अपयशी ठरले असल्याचा घणाघात त्यांनी केला. तर या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

Web Title: radhakrishna vikhe patil attacks government on aurangabad voilence