लातुरात ६ ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे छापे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

शहरातील सराफा बाजारातील 03 दुकानांवर तर कापड बाजारातील एका दुकानाच्या ठिकाणी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली. दुकानातील व्यवहाराची माहिती प्राप्तीकर विभागाला दिली जात नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

लातूर- शहरातील सराफा बाजारातील 03 दुकानांवर तर कापड बाजारातील एका दुकानाच्या ठिकाणी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली. दुकानातील व्यवहाराची माहिती प्राप्तीकर विभागाला दिली जात नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सराफा बाजारातील कोयले सराफ, आग्रोया गोल्ड आणि सिद्धी ज्वेलर्स यांचा तर कापड बाजारातील अक्षता ड्रेसेस यावरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 02 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे खासगी रुग्णालयावर कारवाई करण्यात आली होती. दुकानातील व्यवहाराची माहिती प्राप्तीकर विभागाला दिली जात नसल्याचा ठपका या दुकानदारांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हि कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

औरंगाबाद विभागाचे जॉईंट कॅमिशनर विक्रांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध मराठवाड्यातील अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. याकरीता ६ पथकांची नेमणूक करण्यात आली असून एका पथकात 05 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तीकर विभागासह हत्यारबंद पोलिस अधिकारीही यांचाही समावेश आहे.

Web Title: Raid by the Income Tax department on 6 places In latur