माहूरमधील झन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

- सोळा हजार रुपयाचा एेवज जप्त 
- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

नांदेड- माहूर तालुक्यात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी माहूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात झन्ना- मन्नाच्या जुगारावर टाकलेल्या छाप्यात तिघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 16 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बुधवारी (ता. दहा) सायंकाळी पाच वाजता केली.

स्थनिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे हे आपले सहकारी बालाजी सातपुते, राजू पांगरीकर, घुंगरुसिंग टाक, जसवंतसिंग शाहू, तानाजी येळगे यांच्यासह बुधवारी शासाकिय वाहनाने माहूर तालुक्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. माहूर परिसरात ते गस्त घालत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन माहूर ठाण्याचे प्रभारी राख व कर्मचारी राठोड यांना सोबत घेऊन त्यांनी पारवेकरनगर भागात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एका लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या झन्ना- मन्ना जुगारावर छापा टाकला.

यावेळी, त्यांनी प्रताप रामसिंग हजारे, देविसींग गोबरा जाधव आणि शेख गफार शेख दौलत यांना अटक केली तर पोलिस दिसताच शेख रहीम शेख लाला शेख हा पसार झाला. डावावरून पोलिसांनी रोख 15 हजार 930 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. विनोद दिघोरे यांच्या फिर्यादीवरुन माहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid On Jhanna Manna Gambling Point