उमरगा शहरात जुगार अड्डयावर छापा

बारा आरोपी ताब्यात ; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
gambling
gamblingSakal

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहरातील अंतुबळी पतंगे सभागृह परिसरात शनिवारी (ता. ११) सायंकाळी एका घरात तीन पत्ती जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह आठ दुचाकी असा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा शहरातील अंतुबळी पतंगे सभागृहाच्या पाठीमागे प्रदीप मोरे यांच्या राहत्या घरासमोर तीन पत्त्याचा जुगार अड्डा चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. जाधवर हे पोलीस पथकासह सायंकाळी पाचच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. या वेळी येथे तीन पत्ते नावाचा जुगार खेळताना बारा जण दिसून आले. जुगारात आढळून आलेले ३३ हजार ४३० रुपयाची रोख रक्कम व आठ दुचाक्या असा तब्बल तीन लाख एक हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सापडलेला मुद्देमाल व आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस नाईक अतुल मुकुंद जाधव यांच्या फिर्यादीवरून प्रदीप मोरे विजयकुमार हेरुरे, प्रदीप सुर्यवंशी, विजय माने, खादिर वाडीकर, बालाजी माळी, सिराज शेख, मारुती देवकर, हणमंत दंडगुले, दत्ता पवार, संजय उपासे रा. सर्व जण उमरगा व अभिजित सुर्यवंशी रा. मुळज (ता. उमरगा) अशा बारा जणावर शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस हवालदार मनोज सोमवंशी तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com