नांदेड : बळेगाव वाळू घाटावर पोलिसांचा छापा 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

नांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला. तेथून तीन जणांना अटक करून ट्रॅक्टर्स व पोकलेन मशीनसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. 14) पहाटे दीडच्या सुमारास केली. 

कुंटूर, नायगाव, देगलूर, धर्माबाद, नांदेड या भागातून अवैध वाळू उपसा महसुल विभागाच्या नाकावर टिच्चुन वाळू माफिया करीत आहेत. गोदावरी, लेंडी, मांजरा या नद्यांची वाळू उपसा झाल्याने चाळणी झाली आहे. बेसुमार वाळू उपस्यामुळे नैसर्गिक पर्यावरण ढासळत चालले आहे. नदी पात्रात केलेल्या खड्ड्यांमुळे जिवीत हानी घडत आहे. परंतु या वाळु माफियांना महुसल विभाग अभय देत असल्याचे दिसून येते. रस्त्यांची धूळधाण उडत असून रस्ता परिसरात पिकांवर धुळीचे लोट निर्माण झाले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मिळालेल्या माहितीवरुन बिलोली उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी आपल्या पथकाला वाळू वाहतुक करणाऱ्या टेम्पोतूनच बळेगाव (ता. नायगाव) घाटावर कारवाईसाठी पाठविले. रविवारी (ता. 14) पहाटे दीड वाजता हे पथक घाटावर धडकताच अनेकांचे धाबे दणाणले.

पोलिसांनी साहेबराव सटवाजी पंदेवाड, गंगाधर माधवराव बेलकर यांना अटक केली. तसेच घाटावरून विनापरवानगी अवैध वाळू उपसा करणारी पोकलेन मशिन आणि वाहतुकीसाठी थांबलेले चार ट्रॅक्टर्स असा नऊ लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केला. एपीआय शरद मरे यांच्या फिर्यादीवरुन कुंटूर ठाण्यात वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार एस. एस. कुमरे हे करीत आहेत. 

Web Title: raid by police at balegao soil area at nanded