नांदेड : वाळूचोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर छापा

nanded
nanded

उमरी (जि. नांदेड) : उमरी तालुक्यातील इळेगाव वाळू घाटाचा लिलाव झाला नसतानाही गेल्या काही दिवसांपासून इळेगाव येथे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. त्यानंतर धर्माबाद येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस धिकारी नुरूल हसन यांच्या पथकाने काल (ता.13) सायंकाळी सहा वाजता इळेगाव घाटावर नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करून वाळू चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टर व त्यांच्या  चालकांवर छापा टाकला.

त्यांना ताब्यात घेऊन 24 लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या पथकात उपनिरीक्षक सुर्यकांत सुर्वे व चालक, कात्रे,जमादार गेडाम,भार्गव आदींचा समावेश होता. या सर्वांवर भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात  आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com