लातूर पोलिसांचे आंबे विक्रेत्यांवर छापे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

लातूर - आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड (कारपेट) वापरले जात आहे, अशी माहिती मिळताच लातूर पोलिसांनी आंबे विक्रेत्यांवर आज छापे घातले. या वेळी 39 किलो कॅल्शियम कार्बाईड पोलिसांनी जप्त केली आहे. शिवाय, आंबा विक्रेत्यांच्या दुकांनांना "सील'ही ठोकले आहे. 

सध्या बाजारात वेगवेगळे आंबे आले आहेत; पण आंबे लवकर पिकावेत म्हणून कॅल्शियम कार्बाईड व इतर घातक पावडर टाकली जात आहे. याबाबतची पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित व्यापाऱ्याच्या दुकानावर छापा घातला. ही पावडर कोठून आली, अशी चौकशी करताना आणखी एका व्यापाऱ्याचे नाव पुढे आले. त्यावर छापा घातल्यानंतर पोलिसांना 39 किलो कॅल्शियम कार्बाईड सापडले. या प्रकरणी सिद्दिकी रहेमान बागवान या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Raids on the mangoes Vendors of the police