Railway bogie factory starts by the end of September in Latur
Railway bogie factory starts by the end of September in Latur

रेल्वे बोगी कारखान्यास सप्टेंबर अखेरपर्यंत सुरवात; पालकमंत्री निलंगेकर यांची माहिती

लातूर : रेल्वे बोगी तयार करण्याच्या कारखान्यामुळे लातूर जिल्ह्यासह परिसरातील बेरोजगार युवकांना मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाच्या प्राथमिक स्तरावरील कामासाठीची निविदा प्रसिध्द झाली आहे. पुढील कामे प्रत्यक्षात सप्टेंबर अखेर पासून सुरु होणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७० वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका
आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, जिल्हा परिषद
अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष
रामचंद्र तिरुके, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे उपस्थित होते.

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. भूजल
विभागामार्फत योजनेच्या तीन टप्प्यात १२१ गावांमध्ये ४७७ रिचार्ज शॉफ्टची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार शेतकऱ्यांना सुमारे ३८६ कोटीची कर्जमाफी देण्यात आली आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रूपये अनुदान देणे बाबतच्या योजनेत जिल्ह्यातील सुमारे ५६ हजार पात्र शेतकऱ्यांना १८ कोटीचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे, असे ते म्हणाले. विदर्भ मराठवाडा विकास प्रकल्प या योजनेअंतर्गत लातूर जिल्हयातील लातूर, औसा, अहमदपूर, रेणापूर व चाकूर या पाच तालुक्यातील ३४९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तीन हजार हजार १६ दुध उत्पादकांसाठी मदर डेअरीचे ६० दुध संकलन केंद्र कार्यरत आहेत. पशुपालकांना दुध उत्पादनातून आर्थिक स्वावलंबन प्राप्त होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर मराठवाडयाची लातूर जिल्हयासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु आहे. या विकासाला थोर हुतात्म्यांच्या बलिदानाची ऊर्जा लाभली आहे, असे श्री. निलंगेकर म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित
स्वातंत्र्य सैनिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. या समारंभाचे सूत्रसंचालन संवादतज्ञ उध्दव फड यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com