अकोला-पनवेल लिंक एक्‍सप्रेसला लवकरच हिरवा कंदील

मंगेश शेवाळकर
शनिवार, 13 मे 2017

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई येथे जाणे सोईचे व्हावे, यासाठी अकोला-हिंगोली-पनवेल लिंक एक्‍सप्रेस सुरु करण्याची मागणी शुक्रवारी (ता.१३) आढावा बैठकीत केली. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने या रेल्वेला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई येथे जाण्यासाठी रेल्वे सेवे अभावी मोठा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हिंगोली रेल्वे मार्गावरून नवीन रेल्वेगाड्यांची मागणी केली जाऊ लागली होती. 

दरम्यान, शुक्रवारी (ता.१३) नांदेड येथे रेल्वेची वार्षिक आढावा बैठक झाली. या वेळी खासदार राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातील रेल्वेचे प्रश्‍न मांडले. अकोला-हिंगोली-पुर्णा-पनवेल हि लिंक एक्‍सप्रेस सुरु करावी, अशी मागणी खासदार सातव यांनी लावून धरली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत या रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवसांतच या रेल्वेला हिरवा कंदील मिळणार आहे. 

या सोबतच हिंगोली रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे व मुलभुत सुविधा लवकरच पुरविण्याचे आश्‍वासन या वेळी रेल्वे प्रशासनाने दिले आहे. तसेच अजनी-नागपुर-कुर्ला व्हाया हिंगोली या रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात, अमरावती-पुणे या रेल्वेने पुणे येथे जाण्यास तेरा तास लागत असून या रेल्वेचा लूज वेळ कमी करून रेल्वे दहा तासात पोहोचेल याचे नियोजन करावे, अशी मागणी केली.  याशिवाय नांदेड-अकोला-वाराणसी मार्गे बुध्दगया, हैदराबाद-नांदेड-अकोला मार्गे इलाहाबाद लखनौ नवाब एक्‍सप्रेस, काश्‍मीर वैष्णोदेवी अमरनाथ यात्रेसाठी नांदेड-कटरा रेल्वेगाडी, नांदेड-शेगाव-शिर्डीसाठी संत गजानन एक्‍सप्रेस, नांदेड-अकोला-पटना एक्‍सप्रेस, नांदेड-वाराणसी व चार धाम यात्रेसाठी रेल्वेगाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी खासदार  सातव यांनी यावेळी केली आहे.

Web Title: Railway Borad to consider application for Akola Panvel Link Express