रेल्वेने 'एमआयडीसी'ला भरले 21 कोटी 83 लाख

रेल्वेने 'एमआयडीसी'ला भरले 21 कोटी 83 लाख

लातूर : मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱया येथील
रेल्वे बोगी कारखान्याच्या संदर्भात 322 कोटीची निविदा मंजूर होवून आठ-दहा दिवसही झाले नाही. त्यानंतर आता रेल्वेने एमआयडीसीला जागेसाठीचे 21 कोटी 83 लाख रुपये इसारापोटी भरले आहेत. 

येत्या तीस दिवसात 70 कोटी 74 लाख रुपये आणखी रेल्वेकडून एमआयडीसीला भरले जाणार आहेत. ही रक्कम भरल्याने कारखाना उभारणीसाठीचे हे दुसरे पाऊल पडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कारखाना उभारण्याच्या कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे. देशातील एक महत्वाचा रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखाना येथे उभारला जाणार आहे. स्थानिकांना यातून रोजगार उपलब्ध होणार असल्याने
मराठवाड्याच्या दृष्टीने हा कारखाना महत्वाचा मानला जात आहे.

मार्चमध्ये या कारखान्याचे थाटात भूमिपूजन झाले होते. पण रेल्वे अर्थसंकल्पात या कारखान्याविषयी तरतूद नसल्याने विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात होत्या. पण रेल्वे मंत्रालयाने हा कारखाना लवकर कसा उभा राहिल याकडे गांभीर्याने पाहणे सुरु केले असून, त्यातून एक-एक पाऊल टाकले जात आहे. याकरीता मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. 

काही दिवसापूर्वीच या कारखान्याचे काम नोएडाच्या आयएसजीईसी हेवी इंजिनिअरिंग लि.या कंपनीला दिले गेले आहे. या कंपनीची ३२२ कोटीची निविदा मंजूर करण्यात आली. ता. ३० आॅगस्ट रोजी या कंपनीला काम सुरु करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या पुढे जावून आता रेल्वेने या कारखान्यासाठी लागणाऱया जागेसाठी ता. ११ सप्टेंबर रोजी एमआयडीसीला २१ कोटी ८३ लाख २५ हजार रुपये इसारा रक्कम भरली आहे. येत्या तीस दिवसात आणखी ७० कोटी ७४ लाख ९६ हजार रुपये रेल्वे
एमआयडीसीला भरणार आहे. त्यामुळे रेल्वे बोगी कारखाना उभारणीसाठी रेल्वेने दुसरे पाऊल पुढे टाकले आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात या कारखान्याच्या उभारणीला सुरवात होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com