अखेर संग्रामनगरला होणार भुयारी मार्गाच्या कामाला सुरवात

Railway Gardar photo
Railway Gardar photo

औरंगाबाद :  संग्रामनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर लवकरच सुरवात होणार आहे. या कामासाठी अवजड गर्डर आणून टाकण्यात आले आहेत. साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


रेल्वेचा उड्डाणपूल केल्यानंतर फाटक बंद करण्याचा रेल्वेचा नियम आहे. संग्रामनगर येथे उड्डाणपुलाचे काम केल्यानंतर दक्षिण-मध्य रेल्वेने फाटक काढून टाकण्याचा निर्णय घेतला. फाटक बंद झाल्याने या भागातील हजारो नागरिकांना शहरात येण्यासाठी जवळचा रस्ताच राहिला नाही. त्यामुळेच येथील नागरिकांनी आंदोलन उभारले होते. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करुन निधी मिळाल्यानंतर रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला.

अवजड साहित्य आले

त्यामुळेच गेल्यावर्षी 12 ऑगस्ट 2018 रोजी भुयारी मार्गाचे उद्‌घाटन केले. चार महिन्यात भुयारी मार्ग करण्याचे आश्‍वासन रेल्वेने दिले होते. प्रत्यक्षात वर्ष उलटूनही काम झाले नाही. अखेर रेल्वेने कामाची तयारी दर्शविली. त्यानुसार सोमवारी उड्डाणपुलासाठीचे दोन अवजड अंदाजे 28 टन वजनाचे दोन गर्डर सोमवारी (ता. 25) नियोजित भुयारी मार्गाजवळ आणण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

भुयारी मार्गाच्या मागणीसाठी 5 डिसेंबर 2019 रोजी मेट्रो औरंगाबाद असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील, उपाध्यक्ष शिवानंद वाडकर, सचिव डॉ. प्रेम खडकीकर, सतिश लिंभारे यांनी नांदेडला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागभूषण व मुख्य अभियंता सुजितकुमार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार कामाला सुरूवात करण्यात आली. त्यानुसार औरंगाबाद विभागाचे अधिकारी खोबरे यांनी नियोजित संग्रामनगर भुयारी मार्ग जागेचे मोजमाप केले. त्याचप्रमाणे गर्डर ठेवण्याची तसेच क्रेन उभ्या करण्याच्या जागा निश्‍चित करुन ठेवल्या होत्या.

मेगाब्लॉक 15 ते 20 डिसेंबरदरम्यान

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता रेल्वेचे अधिकारी सुजितकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेवरुन हा मेगा ब्लॉक 15 ते 20 डिसेंबररोजी घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com