रेल्वेची भरती एक्‍स्प्रेस सुसाट!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - वर्ष 2018 मध्ये भारतीय रेल्वेची भरती एक्‍स्प्रेस सुसाट धावत आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जवळपास 90 हजार जागांच्या लोकोपायलट व गट "ड' कर्मचारी भरतीच्या जाहिरातीनंतर रेल्वेने आता 1,120 उपनिरीक्षक आणि 8,619 कॉन्स्टेबलची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

औरंगाबाद - वर्ष 2018 मध्ये भारतीय रेल्वेची भरती एक्‍स्प्रेस सुसाट धावत आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जवळपास 90 हजार जागांच्या लोकोपायलट व गट "ड' कर्मचारी भरतीच्या जाहिरातीनंतर रेल्वेने आता 1,120 उपनिरीक्षक आणि 8,619 कॉन्स्टेबलची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

उपनिरीक्षक पदाची वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे (ओबीसी - 28 वर्षे, एससी/एसटी - 30 वर्षे) आणि कॉन्स्टेबल पदासाठी 18 ते 25 वर्षे (ओबीसी - 28 वर्षे, एससी/एसटी - 30 वर्षे) आहे. उपनिरीक्षक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो, तर कॉन्स्टेबल पदासाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2018 आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

तीन टप्प्यांत परीक्षा
सदरील परीक्षा तीन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात 120 गुणांची परीक्षा होईल. त्यात सामान्य ज्ञान (50 गुण), गणित (35 गुण) आणि बुद्धिमत्ता चाचणी (35 गुण)चा समावेश आहे. परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असून, परीक्षा सप्टेंबर/ऑक्‍टोबर 2018 मध्ये होईल. दुसऱ्या टप्प्यात शारीरिक क्षमता चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात शारीरिक मोजमाप चाचणी होईल. परीक्षा 15 वेगवेगळ्या भाषांमधून होत असून, मराठीमधून परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

रेल्वेच्या तांत्रिक विभागात सेक्‍शन इंजिनिअर आणि कोणत्याही शाखेच्या पदवीधरांसाठी सहायक स्टेशन मास्तरची जाहिरात लवकरच अपेक्षित आहे. मराठी विद्यार्थ्यांनी रेल्वे परीक्षांबाबत असलेली उदासीनता सोडून तयारीला लागावे. एकाच अभ्यासक्रमावर आधारित बॅंक, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्‍शन आणि रेल्वे परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढवावा.
- ज्ञानदेव वराडे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक

Web Title: railway recruitment