esakal | अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळणार : राज्यमंत्री संजय बनसोडे | Latur Rain News
sakal

बोलून बातमी शोधा

Environment Minister For State Sanjay Bansode

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळणार : राज्यमंत्री संजय बनसोडे

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत राज्यभरात पंचनामे करण्याचे काम चालू आहे. पूर्ण पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्यासह मोठी आर्थिक मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी शुक्रवारी (ता.१) दिली आहे. देवर्जन (ता.उदगीर) येथे शुक्रवारी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करण्यासाठी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी ते संवाद साधत होते. अतिवृष्टीने (Rain) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्या वर्षीचा पिक विमा मिळाला नाही, यावर्षी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई व पीक विमा मंजूर करावा, लाईट बिल माफ करावे अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.

हेही वाचा: औरंगाबादेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी लोटांगण आंदोलन

यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, संपूर्ण राज्यात यावर्षी अतिवृष्टीची परिस्थिती असून त्यातल्या त्यात मराठवाडा व लातूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही दिवसात या नुकसानीबाबत मुख्यमंत्री घोषणा करणार आहेत. या भागातील सर्व परिस्थिती मी शासन दरबारी पोचवुन या भागातील शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत मिळवून देण्यासाठी व पीक विमा मंजूर करून घेण्यासाठी वचनबद्ध आहे.

loading image
go to top