बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. या पार्श्‍वभूमीवर दीर्घ खंडानंतर शनिवारी पावसाने लावलेली हजेरी सुखावून गेली.

बीड - पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. या पार्श्‍वभूमीवर दीर्घ खंडानंतर शनिवारी पावसाने लावलेली हजेरी सुखावून गेली.

बीड, केज, परळी या तालुक्‍यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. बीड शहरात तासभर बऱ्यापैकी पाऊस झाला. पावसाळ्याचे शेवटचे पंधरा दिवस शिल्लक आहेत. आतातरी मोठ्या परतीच्या पावसाने हजेरी लावावी, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in beed district

टॅग्स