दमदार पावसामुळे वाढला पोळा सणाचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

रिमझिम पावसानंतर काही दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी (ता. 29) मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह लोहगाव परिसरात हजेरी लावली. यामुळे शुक्रवारी परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी पोळा सण उत्साहात साजरा केला.

लोहगाव (जि.औरंगाबाद) : रिमझिम पावसानंतर काही दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी (ता. 29) मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह लोहगाव परिसरात हजेरी लावली. यामुळे शुक्रवारी परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी पोळा सण उत्साहात साजरा केला.

महिनाभरापूर्वी रिमझिम पाऊस झाला होता. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारल्याने पिके वाळून जात होती. पोळा सणाच्या आदल्या रात्री झालेल्या पावसाने
शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. गुरुवारी (ता.29) रात्री विजांच्या कडकडाटासह लोहगाव, मुलानीवाडगाव, लामगव्हाण, मावसगव्हाण, शेवता, तारुपिंपळवाडी, विजयपूर, ढाकेफळ, अमरापूरवाघुडी, 74 जळगाव, दिन्नापूर, शहापूरमानेगाव, खामजळगाव, तोंडोळी, गाढेगावपैठण, ब्रह्मगव्हाण आदी गावांमध्ये पाऊस पडल्याने पोळा सण शेतकऱ्यांनी आनंदात साजरा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Bring Energy Into Pol Festival