पाऊस आला धावून, टंचाई गेली वाहून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जुलै 2016

आजपासून टॅंकर बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश
औरंगाबाद - आठवडाभरातील पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर बुधवारपासून (ता.१३) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील नऊही तालुक्‍यांतील टंचाईग्रस्त गावांना ९५४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जुलैत सर्वाधिक टॅंकर सुरू राहण्याचा प्रकार पहिल्यांदाच अनुभवयास आला.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जून महिन्यातही काही ठिकाणी थोडा पाऊस बरसला होता. परिणामी, पाण्याची उपलब्धता झाली. रविवारी सर्वदूर झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी बऱ्यापैकी वाढली. या पावसामुळे आठवडाभरात ५०० टॅंकर बंद झाले होते. उर्वरित टॅंकरचाही मंगळवारी (ता.१२) आढावा घेण्यात आला. त्यानुसार, उर्वरित ३५४ टॅंकर बुधवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासून टॅंकर बंद केल्यानंतर खरोखरीच आवश्‍यकता असलेल्या गावांकडून तालुकास्तरावर मागणी नोंदविली जाईल, त्यानंतर तिथे टॅंकर सुरू करण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आहे. गेल्यावर्षीचा पावसाळा जेमतेम होता. सप्टेंबर २०१५ मध्ये दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे काही भागातील पाणीटंचाईचे संकट टळले होते. पण जुलैपासून काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दिवाळीनंतर सात तालुक्‍यांमध्ये तीव्र टंचाई जाणवायला सुरू झाली होती.

Web Title: The rain came to the rescue, carry the scarcity