पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सततच्या दुष्काळाने हैराण झालेल्या तालुक्‍यातीलशेतकऱ्यांना यावर्षी मात्र वरुणराजाने दिलासा दिला असून, तालुक्‍यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सहा वर्षाच्या कालखंडानंतर तालुक्‍यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून, दोन महसूल मंडळ वगळता सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाची पिके जोमात डोलू लागली आहेत. निल्लोड, बोरगाव बाजार मंडळांत पावसाचा जोर कमी असला तरी खरिपाची पिके मात्र जोमात आहेत.

सिल्लोड, ता. 23 (बातमीदार) : सततच्या दुष्काळाने हैराण झालेल्या तालुक्‍यातीलशेतकऱ्यांना यावर्षी मात्र वरुणराजाने दिलासा दिला असून, तालुक्‍यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सहा वर्षाच्या कालखंडानंतर तालुक्‍यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून, दोन महसूल मंडळ वगळता सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाची पिके जोमात डोलू लागली आहेत. निल्लोड, बोरगाव बाजार मंडळांत पावसाचा जोर कमी असला तरी खरिपाची पिके मात्र जोमात आहेत.

पावसाच्या सरासरीचा विचार केल्यास मागील वार्षिक सरासरीपेक्षाही पन्नास टक्के पाऊस कमी झाला होता. गतवर्षी केवळ 340.45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षीच्या सुरवातीपासूनच वरुणराजाने कृपादृष्टी केल्यामुळे
तालुक्‍यातील सर्व प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. निल्लोड मंडळाचा अपवाद वगळता सर्वत्र नदी-नाले खळाळून वाहू लागले आहेत. या कालावधीमध्ये तालुक्‍याची
वार्षिक सरासरी 581 मिलिमीटर अपेक्षित असताना अपेक्षेपेक्षा सुमारे 100 मिलिमीटर
पावसाची जास्त नोंद झाल्यामुळे पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
 

मागील सहा वर्षांत झालेला सरासरी पाऊस.वर्ष पावसाची सरासरी नोंद (मिलिमीटरमध्ये)
2013 -834
2014 -547
2015 -626
2016 -607
2017 -616
2018 -340


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Cross Annual Average