esakal | ज्वारी झाली काळी, कापसाचीही स्थिती तशीच; पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Damaged Jawar In Jalkot

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात सतत तीन दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतातील पांढरी ज्वारी काळी झाली आहे. कापसाच्या वाती झाल्या आहेत. या स्थितीमुळे शेतकरी सध्या काय करावे या द्विधा मनस्थितीत आहे.

ज्वारी झाली काळी, कापसाचीही स्थिती तशीच; पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातुर) : जळकोट तालुक्यात सतत तीन दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतातील पांढरी ज्वारी काळी झाली आहे. कापसाच्या वाती झाल्या आहेत. या स्थितीमुळे शेतकरी सध्या काय करावे या द्विधा मनस्थितीत आहे. शेतीत सध्या कापूस, ज्वारी, सोयाबीन हाताला आले आहेत. सोयाबीन काढणी करुन शेतात ठेवले आहेत. तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने रास करता येत नाही. ज्वारी कापणीला आली आहे, तर कापूस वेचणीला आला आहे.

वेळीच मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पिक डोळ्यासमोर नासाडी होताना दिसत आहे.पावसामुळे मूग, उडीद गेले सोयाबीन पन्नास टक्के खराब झाले. आता कापूस व ज्वारी हातात पडेल अशी आशा शेतकऱ्यांची असताना आता तीन दिवसांपासून परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मागे हात धुवून लागला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या मागील दुष्टचक्र दूर होताना दिसत नाही. शेतातील हाताला आलेले पिक रात्री डोळ्यासमोर दिसत सकाळी लवकर उठवून सोयाबीन रास करावी व हाताला आलेला कापूस वेचून सावकाराचे देणे द्यावे.

उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान

यामुळे रात्रभर डोळे उघडून बसत आहोत, पंरतू चार दिवसांपासून पाऊस काही थांबताना दिसत नाही. पहाटे झालेला दिवस तसाच निघत आहे. खरिपातील हाताला आलेले पिक हातातून निघून जात आहे. शेतकऱ्यांनी जगावे कसे असा प्रश्न आमच्यापुढे पडला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शासनाने रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांसह शेतकरी करित आहेत. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पाण्यात, ऊस पडला आढवा, उभी ज्वारी पडू लागली असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.

संपादन - गणेश पिटेकर