मिठाने पाडतो पाऊस, संशोधक डॉ. राजा मराठे यांचा दावा 

अनिलकुमार जमधडे 
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - खोळंबलेले ढग पाऊस रुपाने खाली आणण्यासाठी संशोधक डॉ. राजा मराठे यांनी यशस्वी प्रयोग केले आहेत. अवघे दोन टायर जाळून त्यावर पन्नास किलो मिठ टाकाले तर पाच किलोमिटरच्या परिसरात पाचशे टॅंकर पाऊस पाडता येतो असा त्यांचा दावा आहे. 

महाराष्ट्रातील पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन डॉ. मराठे यांनी पाऊस पाडण्याचा हा साधासुधा प्रयोग यशस्वी केला आहे. सन 2009 पासून त्यांनी चारशे प्रयोग केले असून, साधारण 80 टक्के पाऊस पडतो असे त्यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. आता परतीचा पाऊस अशा प्रयोगाने पाडता येऊ शकतो त्यामुळे गावागावातून असे प्रयोग करावेत असे आवाहन डॉ. मराठे यांनी केले आहे. 

काय होते प्रक्रिया 
- आकाशात ढग आले की, हा प्रयोग करता येतो. 
- ढग नसले तरीही आठ दिवस अकाशात मीठाची आद्रता राहते, त्या काळात पाऊस पडतो. 
- तीनशे किलो लाकुड किंवा दोन मोठे टायर आणि पन्नास किलो मिठ एवढीच सामग्री पाऊस पाडते.
- दोन टायर किंवा तीनशे लकुड जाळून होळी करावी, त्यात मीठ टाकत रहावे.
- आगीच्या तापमानाने घनरुप मीठाची वायूरुप वाफ होते, ही प्रक्रिया ढगात पोहचल्यावर पाऊस पडतो. 

Web Title: Rain drops beacuse of salt, Claims Dr. raja Marathe