हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे यावर्षी हंगामात चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे यावर्षी हंगामात चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 30 पैकी 19 मंडळात दमदार पाऊस झाला असून, त्यात माळहिवरा महसूल मंडळात 30 मिलिमीटर, बासंबा 18, कळमनुरी 15 ,नांदापूर 25, आखाडा बाळापुर 18, डोंगरकडा 14, वारंगा 12, गोरेगाव 13, आजेगाव 12, वसमत 12, हट्टा, 16 गिरगाव, 19, कुरुंदा  14, टेंभुर्णी 11, आंबा 15, हयातनगर 23, जवळा बाजार 12, येहेळगांव सोळंके १३, साळणा मंडळात दहा मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: rain in Hingoli