हिंगोलीत दहा मंडळात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सरी चांगलेच बसले आहेत शुक्रवारी तारीख 8 झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यात नदी नाल्यांना पूर आले आहेत याशिवाय कळमनुरी तालुक्यातही मोठ्या पावसाची नोंद झाली आहे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये चोवीस तासात 3० पैकी १० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून वसमत तालुक्यातील आंबा मंडळात सर्वात जास्त १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सरी चांगलेच बसले आहेत शुक्रवारी तारीख 8 झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यात नदी नाल्यांना पूर आले आहेत याशिवाय कळमनुरी तालुक्यातही मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोविस तासात जिल्ह्यातील तीस मंडळांपैकी  दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये आंबा १८०मिलीमीटर नांदापूर १०४ मिलिमीटर वसमत ९०, माळहिवरा ९०, बासंबा ९५, कळमनूरी ८६, हट्टा ८० , कुरुंदा ७५ , हयातनगर ७५, सिरसम बुद्रुक ७१, मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे याशिवाय इतर मंडळांमध्ये ही चांगला पाऊस झाला आहे. 

या शिवाय हिंगोली ४४, खांबाळा १७, नरसी १८, आखाडाबाळापुर ३५, वारंगा फाटा १२, वाकोडी २५, सेनगाव ३0, गोरेगाव ५५, आजेगाव २४, साखरा १५, पानकनेरगाव २०, हत्ता १९, गिरगाव १९, टेंभुर्णी १३, औंढा नागनाथ ३९, जवळाबाजार ३2 ,येहळेगाव ४८, साळणा मंडळामध्ये २७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: rain in Hingoli

टॅग्स