हिंगोली जिल्ह्यास पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर पुन्हा मोठा पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. आता शेतकऱ्यांची मोठ्या पावसाची प्रतीक्षा संपली असून गेल्या चोवीस तासात तुफान पावसाने हिंगोली जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मृगाच्या पावसानंतर उघडीप दिलेल्या पावसाने मागे 24 तासात जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. औंढा तालुक्यातील येहळेगाव मंडळामध्ये तब्बल 152 मिलिमीटर पाऊस झाला,  तर वसमत तालुक्यातील हट्टा येथे 134 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर पुन्हा मोठा पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. आता शेतकऱ्यांची मोठ्या पावसाची प्रतीक्षा संपली असून गेल्या चोवीस तासात तुफान पावसाने हिंगोली जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. औंढा तालुक्यातील येळेगाव मंडळामध्ये तब्बल 152 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ तालुक्यातील मंडळामध्ये 134 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय हिंगोली मंडळात 75, माळहिवरा मंडळात 69, बासंबा मंडळात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस पुढील प्रमाणे : सिरसम बुद्रुक 48 मिलिमीटर, खांबाळा 52, नरसी नामदेव 56 डिग्रस कराळे 37, कळमनुरी 41, नांदापूर 45, आखाडाबाळापुर 25, वारंगा फाटा 16, वाकोडी 15, सेनगाव 24, गोरेगाव 62, आजेगाव 15, साखरा 36, पानकनेरगांव 16, हत्ता बारा, वसमत 22, कुरुंदा, 35, टेंभुर्णी 15, आंबा 21, हयात नगर 7 ,जवळाबाजार 55, तर साळणा मंडळांमध्ये 48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच गिरगाव येथे दोन डोंगरकडा येथे आठ मिलीमिटर पाऊस झाला आहे.

Web Title: rain in Hingoli

टॅग्स