जालना शहरात पावसाच्या हलक्‍या सरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शहरामध्ये मंगळवारी (ता. दहा) दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यानंतर सायंकाळी शहरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. ता. एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 529.68 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ 381.46 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जालना, ता. 10 ः शहरामध्ये मंगळवारी (ता. दहा) दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यानंतर सायंकाळी शहरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. ता. एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 529.68 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ 381.46 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग कायम आहेत.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेला हा पाऊस जोरदार बरसेल अशी आशा होती. मात्र, दहा ते पंधरा मिनिटांनंतर पावसाचा जोर कमी झाला.

3.09 मिलिमीटर पाऊस
मंगळवारी (ता. दहा) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात 3.09 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात जालना तालुक्‍यात 4.25 मिलिमीटर, भोकरदन तालुक्‍यात 9 मिलिमीटर, मंठा तालुक्‍यात 0.75 मिलिमीटर, अंबड तालुक्‍यात 8.29 मिलिमीटर, घनसावंगी तालुक्‍यात 2.43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर बदनापूर, जाफराबाद आणि परतूर तालुक्‍यात पाऊस झाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain In Jalna City