जिकडे-तिकडे पाणीच पाणी... 

बाबासाहेब गोंटे
Friday, 19 June 2020

आलमगाव-नागझरीसह अनेक ठिकाणी गुरुवारी (ता.१८) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाण्याचे पाट साचले होते. परिसरातील नाले, ओढेही खळखळ वाहिले. 

अंबड (जि.जालना) - तालुक्यात आलमगाव-नागझरीसह अनेक ठिकाणी गुरुवारी (ता.१८) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाण्याचे पाट साचले होते. परिसरातील नाले, ओढेही खळखळ वाहिले. 

तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेनंतर ढगाळ वातावरणाबरोबर पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील आलमगाव, लोणार भायगाव, कर्जत, हस्तपोखरी, नागझरीसह आदी ठिकाणी तुफान पाऊस पडला आहे. यामुळे शेतात जिकडे-तिकडे पाण्याचे पाट साचले. शेतशिवार जलमय बनले आहे. शेतातील ओढे, नाले पाण्याने खळखळ वाहत आहेत. जोरदार पावसामुळे शेतजमिनीची माती अनेक ठिकाणी वाहून गेली आहे. 

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

शेतात कपाशी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिके चांगलीच जोमात उगवून आली. अनेकांनी अंतर्गत मशागत करताना निंदणी, औतपाळी करत खताची मात्रा देण्याची लगबग सुरू केली होती. मात्र गुरुवारी सायंकाळच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांतच पावसाच्या पाण्याचे पाट साचले.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

परिणामी उगवून आलेली पिके पाण्याने हातची जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खरिपाची पेरणी वाया जाऊन नव्याने पुन्हा पेरणी करावी लागते की काय, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district