मराठवाडा, नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशीही पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

मराठवाड्यात शुक्रवारपासून परतलेल्या पावसाने शनिवारीही (ता. २०) काही भागांत हजेरी लावली. तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी, असेच त्याचे स्वरूप होते.

औरंगाबाद - मराठवाड्यात शुक्रवारपासून परतलेल्या पावसाने शनिवारीही (ता. २०) काही भागांत हजेरी लावली. तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी, असेच त्याचे स्वरूप होते. पाऊस झालेल्या भागात रखडलेली पेरणी सुरू होईल, तर अल्प पावसावर पेरलेल्या क्षेत्राला टवटवी मिळाली. सर्वदूर दमदार, सातत्यपूर्वक पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद शहराच्या काही भागांतच आज साधारण पाऊण तास पाऊस झाला. जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परभणी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत ५.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

खरिपाच्या आशा पल्लवित
नाशिक : जिल्ह्यात पावसाने शनिवारीदेखील जोरदार हजेरी लावली. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) या तालुक्‍यांसह निफाड, येवला तालुक्‍यांतील खरिपाला जीवदान मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in marathwada and nashik