मराठवाड्यावर गारपिटीचे संकट : वीज पडून शेतकरी, करंट लागून मुलगा ठार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. बीड जिल्ह्यात तर जोरदार गारपीट झाली. यात परळी तालुक्यात वीज पडून एक शेतकरी ठार झाला, तर अंबाजोगाई तालुक्यात गायीचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात एका मुलाचा पत्र्यात करंट उतरल्यामुळे जीव गेला. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश गावांत बुधवारी (ता. १८) सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. बीड जिल्ह्यात तर जोरदार गारपीट झाली. यात परळी तालुक्यात वीज पडून एक शेतकरी ठार झाला, तर अंबाजोगाई तालुक्यात गायीचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात एका मुलाचा पत्र्यात करंट उतरल्यामुळे जीव गेला. 

बीड जिल्ह्यात सोमवारपासूनच (ता. 16) अवकाळी पाऊस सुरु आहे. मंगळवारी गेवराई तालुक्यात गारांचा पाऊस झाला. तर, वीज पडून एक गाय व बैल झाले झाले. तर, धारुर तालुक्यात वीज पडून एक शेतकरी भाजला आहे. बुधवारीही अंबाजोगाई, परळी, धारुर, गेवराई तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अंबाजोगाई व परळी तालुक्यातहील काही भागात गारपीट झाली.

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

परळी तालुक्यातील मांडखेल येथे वीज पडून सुधाकर नागरगोजे (वय 35) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर, पुस (ता. अंबाजोगाई) येथे वीज पडून एक गाय ठार झाली. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात हिंपळनेर गावात हैदर रहिम शेख (वय १६) याचा घराच्या पत्र्यात करंट उतरल्यामुळे मृत्यू झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही गावांना झोडपले

कळंब तालुक्यात बुधवारी (ता.१८) सायंकाळी चारपासून हा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या ज्वारी, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कळंब तालुक्यातील शिराढोण, नायगाव, रांजणी, देवधानोरा, एकुरगा, मंगरुळ, शेळका धानोरा, गोविंदपूर आदी भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

Rain In Marathwada

रब्बी पिकांना फटका

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. त्यातच अचानक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. पावसामुळे ज्वारी भिजून काळी पडण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडे उन्मळून पडली.

 • देवधानोरा (ता. कळंब) परिसरात बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गाराचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या हातातोंडाशी आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 • अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले तर विजेच्या ताराही काही ठिकाणी तुटल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, देवधानोरा, गोंविदपुर, बोरगाव (बुद्रुक), गौरगाव, नागुलगाव, हासेगाव (शि.) एकुरका, जवळा (खुर्द), बोरवंटी, भाटशिरपुरा परिसरात या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. 
 • शिराढोण परिसरातील रांजणी, नायगाव, रायगव्हाण, एकुरगा, पाडोळी (ना.) परिसरात झालेल्या या गारपीटीमुळे ज्वारी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
 • शिराढोण परिसरात अर्धातास हा गाराचा अवकाळी पाऊस होता. रायगव्हाण, पाडोळी (ना.) परिसराला तासभर पावसाने झोडपले. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. 
 • नायगाव (ता. कळंब) परिसरात वादळी वाऱ्यासह गाराचा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नायगावसह काही भागात बुधवारी सायंकाळी (ता.१८) पाचच्या सुमारास विजांच्या कडकडासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.
 • तुळजापूर तालुक्यातील सावरगाव महसूल मंडळात पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे तहसील कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली. पावसामुळे शेतातील ज्वारी, गहू, हरभरा काढणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली. द्राक्ष बागांचेही अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. 
 • मंगरूळ परिसरात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सध्या शेतकरी गहू पिक काढणीच्या कामात व्यस्त असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली. वादळी वाऱ्याने आंब्याच्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला तर ज्वारीचे पिक जमीनदोस्त झाले आहे. 
 • खामसवाडी परिसरात बुधवारी सांयकाळी पाच ते सहाच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या व काढुन ठेवलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे भिजुन मोठे नुकसान झाले. 
 • येरमाळा (ता. कळंब) परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने काढणी करून ठेवलेल्या, काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले. येरमाळ्यासह दुधाळवाडी, रत्नापूर, पानगाव, येरमाळा, उपळाई, मलकापूर, बांगरवाडी (ता. कळंब) परिसरातील रब्बी पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. 
 • तेरखेडा (ता. वाशी) परिसरात बुधवारी सायंकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान अर्धातास अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारी काळी पडण्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. 
 • सावरगाव (ता. तुळजापूर) येथे द्राक्ष बागेत वादळामुळे सुमारे 40 लाख रुपयांचे झाले. द्राक्षबागेत वादळ झाल्याने बाग खाली पडली. ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. 

लातूरमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

लातूर परिसरात रात्री वीजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बीच्या पिकाना फटका बसण्याची शक्यता आहे. शहरात काही भागात वीजेचा लपंडावही पहायला मिळाला.

Image may contain: plant, outdoor and nature

पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे

औसा, बेलकुंड, जळकोट, पानगाव (ता. रेणापूर), नळेगाव, तांदूळजा (ता. लातूर), रोहिणा, जानवळ (ता. चाकूर) येथे वादळी वाऱय़ासह पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. कासारशिरसी, अहदमपूर, किल्लारी, उजनी परिसरात सायंकाळी ढगाळ वातावरण होते. 

परभणी तालुक्यात गव्हाचे पीक आडवे

परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सांयकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पालम, पूर्णा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुले शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ताडकळस, झिरोफाटा शिवारात पाऊस झाला. सेलू, मानवत, पाथरी, जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात ढगाळ वातावरण होते. 

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस 

 • हिंगोली शहरासह तालुक्‍यातील खांबाळा, बळसोंड, भांडेगाव, साटंबा, आंधारवाडी आदी गावांत पाऊस झाला. कळमनुरी तालुक्‍यातील वारंगाफाटा, पोतरा, बोल्‍डा, येहळेगाव, असोला आदी ठिकाणी पाऊस झाला.
 • सेनगाव तालुक्‍यातील सेनगावसह केंद्रा बुद्रुक, कहाकर, बन, बरडा, ताकतोडा वरखेडा, जामठी, गोंधनखेडा, गोरेगाव आदी ठिकाणी, औंढा नागनाथ तालुक्‍यातील औंढा शहरासह गोळेगाव, गोजेगाव, येळी, केळी, साळणा, वसमत तालुक्‍यातील गिरगाव, कुरुंदा, हट्टा, बाराशिव, करंजाळा, बोरीसावंत, तपोवन आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
 • सेनगाव तालुक्‍यातील खडकी येथील अंकुश हराळ या शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेल्या म्‍हशींवर वीज कोसळल्याने दोन्हीही म्‍हशी जागेवरच दगावल्या. 

नांदेड शहरासह जिल्ह्यात पाऊस 

नांदेड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास अवेळी पावसाने दणका दिला. अर्धापूर तालुक्यातील दाभड परिसरात गारपीट झाली. हा पाऊस नांदेड शहर, देगलूर, लोहा, मुक्रमाबाद आदी भागात झाला. या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. कापणीसाठी आलेला गहू व हरभरा पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

Rain In Marathwada Nanded Osmanabad latur Osmanabad Aurangabad Parbhani Hingoli


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain In Marathwada Nanded Osmanabad latur Osmanabad Aurangabad Parbhani Hingoli