पावसाची वारी अधुरीच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

गेल्या तीन वर्षांपासून अल्प प्रमाणात पडणाऱ्या पावसाने मराठवाड्यात उशिरा हजेरी लावली आहे. यात मराठवाड्यातील काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तरीही अजूनही मोठ्या पावसाची वारी अधुरीच आहे. आतापर्यंत ५३.३ टक्‍के पाऊस पडला. वार्षिक सरासरी पाहायची झाल्यास केवळ दहा टक्‍केच पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

मराठवाड्यात अजूनही मुसळधारची प्रतीक्षा, ५३.३ टक्‍के पाऊस; वार्षिक सरासरी १० टक्केच 
औरंगाबाद - गेल्या तीन वर्षांपासून अल्प प्रमाणात पडणाऱ्या पावसाने मराठवाड्यात उशिरा हजेरी लावली आहे. यात मराठवाड्यातील काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तरीही अजूनही मोठ्या पावसाची वारी अधुरीच आहे. आतापर्यंत ५३.३ टक्‍के पाऊस पडला. वार्षिक सरासरी पाहायची झाल्यास केवळ दहा टक्‍केच पाऊस मराठवाड्यात झाला आहे. 

मराठवाड्यातील सात मंडळे सोडता अजूनही इतर ठिकाणी मोठ्या पावसाची अपेक्षा असून, मराठवाड्यात १४५.८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात रविवारी (ता. ३०) सकाळी आठपर्यंत ९.८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सात मंडळांत अतिवृष्टी झाली आहे; मात्र इतर भाग कोरडा आहे. आठही जिल्ह्यांत सरासरी एक ते दोन परिमंडळ सोडता इतर मंडळांत जोरदार पाऊस हवा आहे. यामुळे अजूनही अनेक ठिकाणची शेतीकामे खोळंबली आहेत. गेल्या वर्षी १ जून ते ३१ ऑक्‍टोबरदरम्यान मराठवाड्यात ७७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. जालना जिल्ह्यात भोकरदन सोडता इतर ठिकाणी पाऊस नाही. हीच स्थिती प्रत्येक जिल्ह्यात दिसून येत आहे.   

या परिमंडळात अतिवृष्टी
यासह आठवड्याभरात मराठवाड्यातील कळंब (उस्मानाबाद) - ६५ मिलिमीटर, रेणापूरच्या पोहरेगाव - ६५ मिलिमीटर, नांदेड किनी - ६९ मिलिमीटर, औरंगाबाद लासूरगाव - १०९ मिलिमीटर, जालना रोशनगाव - ६९ मिलिमीटर, भोकरदन - ९२ मिलिमीटर, अन्वा - ७० मिलिमीटर मंडळात अतिवृष्टी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Water