पाऊस : माहूर, मुखेड, देगलूरला प्रतीक्षाच; हिमायनगरमध्ये दमदार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

दीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. पण अजूनही माहूर, मुखेड, देगलूरवर वरुणराजा कोपलेला आहे.

नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २७) माहूर, मुखेड, देगलूर हे तीन तालुके वगळता इतर तालुक्यात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

 
हिमायतनगरमधील दोन तर किनवट तालुक्यातील एक अशा तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी २४.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मोठ्या पावसाअभावी धरणात मात्र पाण्याची आवक झाली नाही. आजपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १९४.१९ मिलिमीटरनुसार २३.०३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गुरुवारनंतर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पाऊस माहूर, मुखेड व देगलूर तालुका वगळता इतर १३ तालुक्यांत समाधानकारक झाला. 

यावेळी हिमायतनगर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हिमयातनगर तालुक्यात सरासरी ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यात हिमायतनगर मंडळात ७१ मिलीमीटर, सरासरी ६६ मिलीमीटर तसेच किनवट तालुक्यातील शिवणी मंडळात ७२ मिलीमीटरची नोंद झाल्यामुळे या तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या सोबतच भोकरमधील किनी मंडळात ६२, हदगावमधील आष्टी मंडळात ५२ तर हिमायतनगरधील जवळगाव मंडळात ५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी २४.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १९४.१९ मिलिमीटरनुसार २३.०३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. धरक्षेत्रात अद्याप पावसाला सुरवात झाली नसल्याने प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ नाही.  

तालुकानिहाय झालेला पाऊस (पाऊस मिलिमीटरमध्ये)

नांदेड ३२, मुदखेड २०.६७, अर्धापूर २०.३३, भोकर ३५.५०, उमरी १७.३३, कंधार २२.६७, लोहा २५.५०, किनवट ३०.२९, माहूर ४, हदगाव ४२.४३, हिमायतनगर ६५, देगलूर ३, बिलोली २२.८०, धर्माबाद २१, नायगाव २०, मुखेड ७.२९.
एकूण ३८९.८१; तर सरासरी २४.३६ मिलिमीटर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Nanded dist