नांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक ठिकाणी वीज गुल झाल्याने अंधाराचे साम्राज्य होते. दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नांदेडकरांना या पावसाने दिलासा दिला.

जिल्ह्यातील माहूर शहरात शनिवारी (ता.26) रात्री साडेआठ वाजल्या पासून वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर विद्युत पुरवठा खंडीत झाला. नऊ वाजता विजेचा जोरदार कडकडाट सुरु होऊन पावसास सुरुवात झाली आहे. प्रचंड उन्हाची लाहीलाही सुरू असताना पारा 44 अशांवर गेल्याने जेष्ठ नागरिकांसह, लहान मुले गर्मीने त्रस्त झाली आहेत. शनिवारी रात्री अचानक आलेल्या पावसामुळे रात्री वातावरणात बदल होवून गारवा निर्माण झाला आहे.

मुदखेड शहरातही रात्री मुसळधार पाऊस झाला, वीज गेली. अर्धापूर, भोकर, लोहा, विष्णुपूरी, आष्टा या परिसरालाही पावसाने झोडपले..

Web Title: rain in nanded district