पावसाची उघडीप; शेतकरी चिंतातुर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - मराठवाड्यात यंदा प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बत्तीस टक्‍के पेरणी आटोपली. पाऊस येईल या आशेवर दुसऱ्या टप्यात शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला; मात्र पुन्हा पावसाचा अंदाज चुकला. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने डोलणारी पिके माना टाकू लागली आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास अनेक पिके पुन्हा काढावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत उशिरा पेरण्या झाल्या. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस होता; मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरवात केली आहे. सिल्लोड, फुलंब्री कन्नड तालुक्‍यांत काही शेतकरी पिकांना विहिरीचे पाणी ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून देत आहेत. सिल्लोड तालुक्‍यात मिरचीचे विक्रमी उत्पन्न निघते. या भागातही पाऊस नसल्याने या मिरचीच्या पिकासह कापूस, मका, इतर पिके वाळू लागली आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे ते इंधन मशीनच्या माध्यामातून पाणी देत आहेत. इतरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या पावसाची अपेक्षा असून शेतकरी चिंतातुर आहे. 

Web Title: Rain stop in marathwada farmers worry