सोयगावसह तालुक्‍यात पावसाची उसंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सोयगावसह तालुक्‍यात शनिवारी (ता.21) पावसाने उसंत घेतली. दिवसभर उन्हाच्या कडाक्‍यात मजुरांनी तीन दिवसांचे अपूर्ण शेतीकामे आटोपले. काही भागात फवारणीच्या कामांनी वेग घेतल्याचे दिसले. सोयगावसह तालुक्‍यात काही भागात आलेल्या नद्यांच्या व नाल्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीसह खरिपाची पिके वाहून गेली आहे.

सोयगाव (जि.औरंगाबाद)  ः सोयगावसह तालुक्‍यात शनिवारी (ता.21) पावसाने उसंत घेतली. दिवसभर उन्हाच्या कडाक्‍यात मजुरांनी तीन दिवसांचे अपूर्ण शेतीकामे आटोपले. काही भागात फवारणीच्या कामांनी वेग घेतल्याचे दिसले. सोयगावसह तालुक्‍यात काही भागात आलेल्या नद्यांच्या व नाल्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीसह खरिपाची पिके वाहून गेली आहे.

यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पिके पाण्यात उभीच होती. काळदरीच्या डोंगरात झालेल्या दमदार पावसाने अग्नावती नदीला पूर येऊन शेतात शिरल्याने शेतीचा भाग व त्यातील पिकेही वाहून गेली आहेत. कपाशी, मका, बाजरी आदी पिकांना पुराचा तडाखा बसला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सोयगाव तालुक्‍यातील पिकांचे पंचनामे आचारसंहितेच्या बडग्यात अडकण्याची शक्‍यता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Stop In Soygaon with Taluka