esakal | Rain Updates: तुळजापूर तालुक्यात रिमझिम पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

rain

Rain Updates: तुळजापूर तालुक्यात रिमझिम पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर (उस्मानाबाद): तालुक्यात सहा दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांची वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. दरम्यान, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तालुक्यात खरिपाची पेरणी पूर्ण झाली. सहा दिवसांपासून वरचेवर पाऊस झाला. त्यामुळे सुकणाऱ्या पिकांना दिलासा मिळालेला आहे. अनेक शेतकऱ्यांची खरीप पिके आता वाढीस लागणार आहेत. तालुक्यात अजूनही पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान इटकळ, जळकोट, सलगरा येथे मुसळधार पाऊस झाला.

तालुक्यात उडीद, मूग, तूर, सोयाबीन आदींसह विविध पिकांच्या पेरण्या होऊन सव्वा महिन्याचा कालावधी लोटला आहे. काही भागात सोयाबीन पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. काही ठिकाणी उडीद, मूग पिकांना फळधारणा होत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झालेली आहे. खरिपाचे क्षेत्र साधारणपणे एक लाख २ हजार हेक्टरपर्यंत पेरणी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा: Covid 19: दिलासादायक! परभणी जिल्ह्यातील ९९ टक्के बेड्स रिक्त

कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात साधारणपणे ८५ हजार ६१२ हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची पेरणी झाली आहे. जवळपास ९५ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तालुक्यात साळी १६४, खरीप ज्वारी ७३, बाजरी १२०, मका ६५०, तूर ९ हजार, मूग ५ हजार ५००, उडीद ४ हजार २००, भुईमूग १७८, तीळ ६, सूर्यफूल ५०, कारळ ८, सोयाबीन ६५ हजार हेक्टर लागवड झालेली आहे. तालुक्यात यंदा खरीप पिकांमध्ये सोयाबीन पिकामध्ये वाढ झालेली आहे. तालुक्यात भुईमूग या पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे.

तालुक्यातील बहुतांशी खरीप पिके सध्या चांगली आहेत. पावसाचा परिणाम खरीप पिकावर चांगला झालेला आहे. वरचेवर पाऊस झाल्यास सर्व पिके चांगली येतील.
- रवी पाटील, शेतकरी, आरळी खुर्द

हेही वाचा: COVID-19| आष्टीतील रुग्णवाढीत घट तर बीड, गेवराईमध्ये रुग्ण वाढले

तालुक्यातील खरीप पिकांना जीवनदान मिळालेले आहे. सोयाबीन पिकाच्या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे. विशेषतः सिंदफळ, सावरगाव आदींसह अनेक गावांना भेटी दिलेल्या आहेत. तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र १ लाख २ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे.
- नामदेव गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर.

loading image