शहरात रात्रभर भिजपाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

गेल्या दोन दिवसांपासून शहरावर जमलेल्या ढगांनी अधूनमधून रिमझिम शिडकावा सुरू ठेवला. रविवारी (ता. २८) मात्र रात्रभर सलग भिजपाऊस सुरू राहिला. चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेअकरा वाजता ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपासून शहरावर जमलेल्या ढगांनी अधूनमधून रिमझिम शिडकावा सुरू ठेवला. रविवारी (ता. २८) मात्र रात्रभर सलग भिजपाऊस सुरू राहिला. चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेअकरा वाजता ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह शहरात राहणाऱ्या नागरिकांचीही चिंता वाढली होती. शनिवारी आणि रविवारी अनेक भागांत पावसाचे आगमन झाल्याने सर्वांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

शहरात शनिवारी रात्री झालेल्या थोड्या पावसानंतर रविवारी सकाळपासून पावसाचे वातावरण कायम होते. सायंकाळी एक जोराचा शिडकावा झाला; पण काही वेळातच तो थांबला. रात्री आठपासून सुरू झालेली रिमझिम मात्र रात्रभर कायम होती. शहर आणि परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक दिवसांनी रात्रभर सलग भिजपाऊस झाल्यामुळे सर्वत्र वातावरण आल्हाददायक बनले आहे. ग्रामीण भागातही गंगापूर, वैजापूर, सोयगाव, पैठण, खुलताबाद, सिल्लोड तालुक्‍यांतल्या अनेक गावांमध्ये पावसाच्या सरी अधूनमधून बरसत राहिल्या. रात्री मात्र सर्वदूर भिजपाऊस झाल्याचे ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Water