तळेगाव (ता. फुलंब्री) येथील बुथमध्ये पावसाचे पाणी

तळेगाव येथील बूथ मध्ये साठलेले पाणी
तळेगाव येथील बूथ मध्ये साठलेले पाणी

औरंगाबाद -  औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार संघात सध्या मतदानाला संमिस्त्र प्रतिसाद मिळत आहे. तळेगाव (ता. फुलंब्री) येथील जिल्हा परीषदेचे तीन बूथ पावसाच्या पाण्यामुळे गळत असल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 


फुलंब्री तालुक्यातील तळेगाव हे जालाना जिल्ह्यातील बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहे. तळेगावचे मतदान 3300 असुन, मतदानासाठी यासाठी चार बुथ आहे. सकाळी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण असत पाऊस सुरू असल्याने जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या तीन बुथ वर्गखोल्या गळत असल्याने वर्ग खोल्यांवर ताडपत्री अंथरण्यात आली आहे. मात्र, ताडपत्री ठाकुनही मतदान केंद्रात पाणी गळत आहे. त्यामुळे मतदान कर्मचाऱ्यांसह मतदात्यांनाही चांगलाच त्रास सोसावा लागत आहे. वर्गखोल्या गळत असल्यामुळे मतदारांना उभे राहण्यासाठी पुरेशी व्यवस्थाही नाही. मतदार कसे तरी गळक्या खोल्यात मतदानासाठी उभे राहात आहेत. अनेक नागरीक याबद्दल नाराजी व्यक्त करत आहे.

गळक्या बुथखोल्यामुळे तळेगाव येथील मतदानाची टक्केवारी घसरण्याची मोठी शक्यता आहे. सध्या परिसरात ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस सुरुच आहे. मात्र, दुपारनंतर जर जोराचा पाऊस आला तर मात्र, तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांसह मतदारांची चांगलीच त्रेधा उडण्याची शक्यता आहे. सध्या शाळेच्या परीसरात ठिकठिकणाची पाणी साठलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com