परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस; वीजही कोसळली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

रविवारी (ता. 18) झालेल्या अवकाळी पावसात बनवस (ता.पालम) गावात वीज कोसळली असून सुदैवाने कुठलीही हानी झालेली नाही. दरम्यान, मध्यरात्री बालाघाट डोंगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून सोमवारी (ता.19) सकाळी सुर्यदर्शन झाले नाही.

परभणी- जिल्ह्यात रविवारी (ता. 18) झालेल्या अवकाळी पावसात बनवस (ता.पालम) गावात वीज कोसळली असून सुदैवाने कुठलीही हानी झालेली नाही. दरम्यान, मध्यरात्री बालाघाट डोंगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून सोमवारी (ता.19) सकाळी सुर्यदर्शन झाले नाही.

रविवारी तापमानात मोठी वाढ झाली होती आणि उकडाही जाणवू लागला. जवळपास अडीच महिन्याच्या खंडानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. तो बालाघाट डोंगर रांगेत चांगला झाला. पावसाने बनवस मंडळात ओलीला ओल गेली असून भेगा बुजण्याईतपत पाऊस होता.

प्रामुख्याने राणीसावरगाव (ता.गंगाखेड), चाटोरी (ता.पालम) महसूल मंडळातही पावसाची नोंद करण्यात आली. मात्र नांदेड महामार्गापासून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होते. ते नोंद घेण्याइतपतही नव्हते. दुसरीकडे कंधार, लोहा (जि.नांदेड) तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तो रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार असला ढगाळ वातावरण अळीसाठी निमंत्रण ठरणार आहे.

Web Title: Raining in Parbhani district also lightning