हिंगोली : पावसामुळे पिकांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

हिंगोली : हिंगोली शहरासह जिल्हाभरात बुधवारी (ता. 16) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर हिवरखेडा गावाजवळ मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे सकाळ पासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी बारा वाजल्यानंतर हळूहळू वाहतुक सुरू झाली आहे.

जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे  सुमारे 3लाख 50 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पीके माना टाकू लागली होती. जिल्ह्याचे प्रमुख पीक समजणारे सोयाबीन पिकाला फुले लागण्याच्या अवस्थेत पाणी नसल्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. तर कापूस तूर ज्वारी या पिकांना ही पावसाची गरज होती. बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर हिवरखेडा गावाजवळ पावसामुळे बाभळीचे झाड कोसळले. त्यामुळे सकाळ पासूनच या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हिंगोली येथून औरंगाबाद कडे जाणाऱ्या या मार्गावरील बसगाड्या रस्त्यातच अडकून पडल्या आहेत. सदर झाड हटवून रस्ता सुरू करण्याचे प्रयत्न हिवरखेडाच्या गावकऱ्यांनी सुरू केले अन त्यानंतर झाड पूर्णपणे बाजूला केल्यानंतर दूपारी बारा वाजल्या पासून वाहतूक सुरळीत झाली. जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे वाहन देखील अडकून पडले होते. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: rains benefits for crop in hingoli