पोटानं आणलं तिथंही दुष्काळच

संदीप लांडगे
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

औरंगाबाद - मराठवाड्यात चार-दोन महिने राहावं. लोखंडी भांडी विकून चांगली कमाई करावी नि आपापल्या गावी निघून जावं, हे स्वप्न घेऊन मध्य प्रदेश, राजस्थानातील लोहार बांधव शहरात दाखल झाले खरे. मात्र, पोटानं आणलं त्या मराठवाड्यातही दुष्काळ. त्यामुळे पाठीवरचं बिऱ्हाड घेऊन कुठंही गेलं तरी हीच स्थिती. आता पोट तरी कसं भरावं, या चिंतेचे घाव सध्या लोहार कारागीर सोसत आहेत.

चित्तोड (राजस्थान), खांडवा (मध्य प्रदेश) येथील सुमारे ४० लोहार समाजबांधव सध्या शहरात दाखल झाले. जालना रस्ता, मुकुंदवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला त्यांनी दुकाने थाटली आहेत. खलबत्ते, तवा, झारे, किसणी, कुऱ्हाड, कढईसारख्या वस्तू त्यांनी तयार केल्या. मात्र, ही भांडी सध्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत पडून आहेत. कधी कधी बोहणीही होत नसल्याचे दुःख सरजूबाई यांनी बोलून दाखविले. मराठवाड्यात यंदाही दुष्काळ असल्याने फारसे ग्राहक मिळत नाहीत. वस्तूंची विक्रीच झाली नाही तर जगावं कसं, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. संतोष चव्हाण, सुसियाबाई कालो या कारागिरांकडे उपजीविकेसाठी याशिवाय दुसरे साधन नाही. 

मदतीसाठी आवाहन  
कडाक्‍याच्या थंडीमुळे लोहार कारागिरांची लहान मुले आजारी पडत आहेत. त्यांच्या रक्षणासाठी आपल्याला मदत म्हणून ऊबदार कपडे देता येतील. ही मदत स्वतः द्यावी किंवा ‘सकाळ’ कार्यालय, एन-१, सिडको टाऊन सेंटर, जालना रोड येथे जमा करावी. 

कारागिरांचे हाल...
  उघड्यावर वास्तव्य असल्याने थंडीचा फटका
  मॉल संस्कृतीमुळे व्यवसाय तोट्यात 
  स्थलांतरामुळे मुले शिक्षणापासून वंचित

Web Title: Rajasthani Lohar Artisan Work Lifestyle Family Drought