औरंगाबाद : विभागीय अधिकारीपदी राजेश जोशी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

जालना तहसिलदार, रोहयो आणि पुनर्वसन आणि निवडणुक विभागाचे उपजिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी या पदावर राजेश रंगनाथ जोशी यांनी काम केले आहे. 

औरंगाबाद : मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकारीपदी असलेले सोहम वायाळ यांची जालना येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणुन बदली झाली आहे. त्यांच्या जागी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते. 

जालना तहसिलदार, रोहयो आणि पुनर्वसन आणि निवडणुक विभागाचे उपजिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी या पदावर राजेश रंगनाथ जोशी यांनी काम केले आहे. त्यांच्या मोबाईल फोटोग्राफीचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्यांच्या या प्रदर्शनातुन आलेली रक्कम ही केरळ पुरग्रस्तांसाठी त्यांनी प्रदान केली होती. विभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांना सुविधा देण्यासाठी कार्य केले आहे.

2017 साली मुंबईत झालेल्या मॅग्नेटीक महाराष्ट्रमध्ये मराठवाड्यासाठी विविध कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात त्यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. राजेश जोशी हे सोमवारी (ता. 25) एमआयडीसीच्या विभागीय अधिकारीपदाची सुत्रे स्विकारणार आहेत.

Web Title: Rajesh Joshi appointed as a Divisional Officer at Aurangabad