Rajesh tope : सर्वसामान्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घ्या

लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न अधिकारी सोडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची गाऱ्हाणी घेऊन ते माझ्याकडे नेहमीच गर्दी करतात
Rajesh Tope
Rajesh Topesakal

घनसावंगी : ‘‘लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न अधिकारी सोडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची गाऱ्हाणी घेऊन ते माझ्याकडे नेहमीच गर्दी करतात. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले पाहिजे’’, असा सूचना आमदार राजेश टोपे यांनी शुक्रवारी केल्या.

येथील तहसील कार्यालयात विविध विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, कल्याण सपाटे, भागवत रक्ताटे, बन्सीधर शेळके, पांडुरंग कथले, राम सावंत यांची उपस्थिती होती. आमदार टोपे म्हणाले, ‘‘घनसावंगी तालुक्यात सर्वात जास्त घरकुले मंजूर झाले असताना घरकुलाचे सर्व प्रस्ताव प्रलंबित आहेत.

ऑनलाइन करण्यासाठी कर्मचारी पैसे मागत असल्याचा तक्रारी आहेत. कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहिले पाहिजे. गाव पातळीवरील सरपंच, त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या पदाचा सन्मान करून ते घेऊन आलेल्या कामांचा निपटारा केला पाहिजे’’, असेही टोपे म्हणाले. यावेळी त्यांनी विद्युत वितरण कंपनी, एकात्मिक बालविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी विभाग, भूमी अभिलेख, शिक्षण या सर्व विभागाचा आढावा घेऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना समज दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com