'लसीकरणाच्या रांगेत अँटीजन टेस्ट करा', आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी (ता.दहा) आढावा बैठक घेण्यात आली
rajesh tope
rajesh toperajesh tope

जालना: कोरोनाचा संसर्ग (corona infection) रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासह बाधितांच्या सहवासितांचा काटेकोरपणे शोध घ्यावा. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या (vaccination) रांगेतील नागरिकांच्या अँटीजन टेस्ट कराव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी (ता.दहा) आढावा बैठक घेण्यात आली. त्यात श्री. टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

rajesh tope
RTPCR टेस्टला जास्तीचे पैसे घेतल्याने लातुरात लॅबचालकाला दंड

श्री. टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधिताचा दर वाढ असून दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यूही होत आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच बाधितांच्या सहवासितांचा अचूकपणे शोध घेण्यात यावा. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात फैलावू होऊ शकतो. म्हणून कोरोना रुग्णांसोबत नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरवर पोलिसांची नियुक्ती करावी. तसेच उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी सातत्याने या सेंटरला भेटी देऊन पाहणी करावी. बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी घ्यावी. तसेच उपचाराच्या संदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करावे. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असलेल्या नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात यावी. जेणेकरून नागरिक बाधित असल्यास त्याच्यापासून दुसऱ्याला होणारा संसर्ग रोखण्यास मदत होण्याबरोबरच लसही वाया जाणार नाही, असे ही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

rajesh tope
दिलासादायक! मराठवाड्यात रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत; मृत्यूदरही घटला

तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यांबरोबर सेंटरमध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध राहण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी, सेवक आदी पदांची तातडीने भरती करण्याबरोबरच नवनियुक्त डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र शववाहिका तातडीने खरेदी करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com