रांगोळीतून रेखाटली रजनीकांत, प्रियंकाची भावमुद्रा....

रजनीकांत
रजनीकांत
 

.
पूर्णा : (जि.परभणी) येथे सह्याद्री रांगोळी आर्टसच्या वतीने येथील सह्याद्री कोचिंग क्लासेसच्या सभागृहात रांगोळी कलावंतांसाठी आठ दिवशीय रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अभिनेता रजनीकांत, अभिनेत्री प्रियंका चोपडा, माधुरि दिक्षीत, सुकन्या कुलकर्णी, यांच्यासह बाल श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ, दत्तात्रेय, पांडूरंग, श्री श्री श्री रविशंकर, साईबाबा, शिवाजी महाराज, शेतकरी निरागस बालकाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा रांगोळीतून रेखाटल्या आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होत आहे. यात परभणीसह नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शंभर कलावंत सहभागी झाले आहेत.

पूर्णा येथे रांगोळी कलावंतांसाठी आठ दिवशीय रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रांगोळीकार सुरेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. त्यात रांगोळीतून पोट्रेट व्यक्तीचित्र साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थीनी साकारलेल्या रांगोळ्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन सोमवारी (ता.११) ज्येष्ठ समाजसेवक डॉ. दत्तात्रेय वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून, ‘देणं समाजा’चे परिवाराचे डॉ. गुलाबराव इंगोले, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष हिराजी भोसले, देविदास उमाटे, डॉ. श्रद्धा वाघमारे, अविनाश आहेरवाडकर, वसंत पांपटवार यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, जीवनाचा खराखुरा आनंद लूटण्यासाठी कलासक्त मनाची गरज आहे. प्रत्येकाला कला अवगत नसली तरी कला रसिकता मात्र, जोपासली पाहिजे. कलावंतच खऱ्या अर्थाने समाज जीवनाला सुंदर बनवण्याचे काम करत असतात. हिराजी भोसले यांनी कोणत्याही कलेला राजाश्रयापेक्षा लोकाश्रय महत्वाचा असतो. प्रदर्शनाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादावरून नक्कीच शहरातही तो मिळत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

या निमित्ताने या कलावंतांसाठी हे मोठेच व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्याद्री आर्टस्चे आभार डॉ. विनय वाघमारे यांनी कौतुक केले. नवोदित कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व रांगोळी कलावंतांचा प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रास्ताविकात सुरेश लोखंडे यांनी रांगोळी सारख्या कलेला सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यशाळा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ.दिलीप शृंगारपुतळे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष सातपुते यांनी केले. 

कला विश्व अधिक समृद्ध
‘देणं समाजाच परिवारा’चे प्रमुख डॉ. गुलाबराव इंगोले यांनी शहर आणि परिसरात अशा कला भरभराटीस आल्यानेच या परिसरातील कला विश्व अधिक समृद्ध, प्रगत आणि विकसित होईल असे मत व्यक्त केले. रांगोळी पाहून परिसरात एवढे सुंदर कलावंत असतील या गोष्टीवर विश्वास बसत नाही. असी भावना व्यक्त केली.
.......

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com