उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षकपदी राजतिलक रोशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांची राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये उपायुक्तपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागेवर पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन हे रुजू होणार आहेत.

उस्मानाबाद ः जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांची राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये उपायुक्तपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागेवर पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन हे रुजू होणार आहेत. त्यांनी यापूर्वी ही जिल्ह्यात सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कमी कालावधीमध्ये उत्त्कृष्ट काम केले आहे.

आर. राजा यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची बदली झाली आहे. 
राजतिलक रोशन हे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून जिल्ह्यामध्ये येत असल्याने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यामध्ये त्यांनी सहायक पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना एका आव्हानात्मक खून प्रकरणाचा उलगडा केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajtilak Roshan as the Superintendent of Police for Osmanabad