चंद्रकांत पाटलांना पाडण्यासाठी स्वाभिमानीचा 'मास्टरप्लॅन'; तर सदाभाऊंना...

Raju-Shetty
Raju-Shetty

औरंगाबाद - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले तर त्यांच्या विरोधात मी स्वतः लढणार, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी जाहीर केले. यावरून चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 'मास्टरप्लॅन' केला असल्याचे स्पष्ट होत आहे.

तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून भाजपवासी झालेल्या व सध्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्या प्रकरणातील सदाभाऊ खोत यांना माझे कार्यकर्ते पुरेसे आहेत, अशी तिरकस टिकाही राजु शेट्टी यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर सोडल्या कडकनाथ कोंबड्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांची होणारी मुस्कटदाबीबद्दल आवाज उठविण्यायासह अन्य मागण्यांसाठी श्री. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येथील क्रांती चौकातून आक्रोश मोर्चा काढला. पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंजमार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्‍त कार्यालय परिसरात पोहचल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले.

महाराष्ट्र उद्योगात आठव्या क्रमांकावर का गेला? याचे उत्तर द्या- मुख्यमंत्री

सभेनंतर पत्रकारांनी त्यांना कडकनाथ कोंबडी प्रकरणी विचारले असता, मंत्री सदाभाऊ खोत यांचाच मुलगा त्यात आरोपी आहे. त्यामुळे याची चौकशी करावीच लागणार. अन्यथा ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढेल. सदाभाऊच्या विरोधात निवडणुक लढणार का, असे विचारले असता, शेट्टी म्हणाले, त्यांच्यासाठी माझे कार्यकर्तेच पुरेसे आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी मतदारसंघाची चाचपणी करीत आहेत. जर ते निवडणुकीत उतरले तर आपण त्यांच्या विरोधात निवडणुक लढवणार, असे श्री. शेट्टी यांनी जाहीर केले.

पोरं खवळली तर नरडीचा घोट घेतील.
मोठ्या कष्टाने एक -एक परीक्षा उतीर्ण झाले तरीही नोकरी देण्याऐवजी सरकार तरुणांच्या जिवांशी खेळतयं, आत्तापर्यंत सहन केलं मात्र, जर पोरं खवळली तर ते सरकारच्या नरडीचा घोट घेतील. तसेच आंदोलनादरम्यान, आमच्या आया- बहिणींकडे सरकारने वाकड्या नजरेनी पाहू नये, अन्यथा आम्हाला तुमचे डोळे काढावे लागतील, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.

महापोर्टल भाजपाच्या एजन्टांसाठीच ?
नोकर भरती करण्यासाठी सुरु केलेल्या महापोर्टलवर सर्वस्तरातून संशय घेतला जातोय. ते का बंद केले जात नाही ? महापोर्टल भाजपाच्या एजन्टांसाठीच सुरु केले काय, असा सवाल श्री. शेट्टी यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com