राजू शिंदेंच्या बंडखोरीचा गुरुवारी फैसला

प्रकाश बनकर
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राजू शिंदे बंडखोरीच्या तयारीत आहेत. बुधवारी (ता. दोन) झालेल्या बैठकीत त्यांना कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी (ता. तीन) निर्णय घेऊ अशी भूमिका नगरसेवक राजू शिंदे यांनी घेतली आहे. 

पश्‍चिम मतदारसंघातून नगरसेवक राजू शिंदे भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयही सुरू केले होते.

मात्र युतीची घोषणा झाल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे शिंदे यांनी पुढील भूमिका ठरविण्यासाठी बुधवारी बीड बायपासवरील हिवाळे लॉनवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी अपक्ष अर्ज दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढणारे विनोद पाटील यांच्यासह जालिंदर शेंडगे, भाजपचे अनिल चोरडिया, नगरसेवक अप्पा हिवराळे, विनायक हिवराळे, बाळासाहेब कारले, देविदास काळे, सतीश पाटील, बबन नरवडे, लक्ष्मण दांडगे यांच्यासह शिवसेनेचेही काही पदाधिकारी उपस्थित होते.

विनोद पाटील म्हणाले, नवीन चेहऱ्याला संधी द्यावी. शिंदे यांना कामाची जाण आहे. चोरडिया म्हणाले, 23 वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम केले. शिरसाटमुळेच पक्ष सोडला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shinde revolts today