Rakshabandhan : बहिणीला भेटण्यापूर्वीच भावावर काळाचा घाला

प्रल्हाद कांबळे 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नांदेड : राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधून घेण्यासाठी बहिणीकडे निघालेल्या भावावर काळाने घाला घातला. एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना बिलोली जवळ असलेल्या दगडापूर रस्त्यावर रविवारी (ता. 26) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. 

बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथील संतोष राजेंद्र दासपल्ले (वय 25) हा रविवारी (ता. 26) दिवसभर शेतातील कामे आटपून सावळी येथे राहणाऱ्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जात होता.

आपली दुचाकी (एमएच 26, एएल-0611) वरून सायंकाळी सातच्या सुमारास जात होता. यावेळी त्याची दुचाकी दगडापूर पेट्रोल पंपासमोर येताच एसटी महामंडळाची बस (एमएच 26, बीएल 1270) च्या चालकाने आपल्या ताब्यातील बस भरधाव व निष्काळजीपणे चालवुन समोरून येणाऱ्या संतोष दासपल्ले यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. बहिणीची भेट घेण्यापूर्वीच भावावर आलेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास बिलोली पोलिस उपनिरीक्षक पंतोजी हे करीत आहेत. 

Web Title: #Rakshabandhan : youth die on road accident