संभाजी भिडेंच्या अटकेसाठी बीडमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

बीड : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये 29 जून रोजी युवा रिपाईंच्या वतीने आक्रोश मोर्चा निघमार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदी यांनी दिली. 

राज्यात दलितांवरील अन्याय वाढत आहेत. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही अटक होत नाही. विहिरीत पोहण्यावरून वाकडी येथे दोन दलित बेदम मारहाण झाली. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडीत नावरदेवासह महिलांना मारहाण झाली. राज्यात आशा दलित विरोधी घटना वाढत आहेत. रमाई घरकुल, गायरान जमीन आणि महामंडळांना निधी आशा मागण्याही मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. यावेळी राजू जोगदंड उपस्थित होते. 

Web Title: rally on 29 june demand for arresting sambhaji bhide in beed by rpi